Advertisement

Responsive Advertisement

जिंतूरात भर चौकातील चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली ,दोन दुकानामधील गल्ल्यातील 3500 रु लंपास

ज्ञानेश्वर रोकडे/जिंतूर 

 शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका मधील सलग चार दुकानाचे अज्ञात चोरट्याने शटर चे कुलूप तोडून चोऱ्या केल्याची घटना सोमवार दि.5 सप्टेंबर रोजी सकाळ च्या सुमारास उघडकीस आली.या घटनेत चोरट्याने दोन दुकानातील गल्ल्यात ठेवलेले चिल्लर अंदाजे 3500 रु लंपास केले.
सदरील वृत्त लिहिपर्यंत घटनेची पोलिसात नोंद झालेली नव्हती. या बाबत अधिक माहिती अशी की शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठेतील नेहमीच गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये सोनी औषधी विक्री दुकान,यमुना मशनरी, पुरोहित स्वीट मार्ट, भोलेनाथ  इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक ही दुकाने असून सदरील चारही दुकानाचे शटर चे कुलूप अज्ञात चोरट्यानी रविवार दि 4 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तोडले या पैकी सोनी मेडिकल व भोलेनाथ इलेक्ट्रिक या दुकानातील एकही वस्तूला त्यांनी हात लावला नाही तर यमुना मशनरी,पुरोहित स्वीट मार्ट या दोन्ही दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करून अनुक्रमे गल्ल्यातील 2500 व 100 असा मिळून एकूण 3500 रु लंपास केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवाड यांनी चारही दुकानाची  पाहणी केली चोरट्याचा मग काढण्यासाठी परभणी येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले श्वानाणे घटनास्थळापासून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानापर्यंत चोरट्याचा मग काढला तिथून चोरटे वाहनाने पसार झाले असावे असा अंदाज पोलिसांनी काढला.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या