Advertisement

Responsive Advertisement

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी गावकऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ.


धर्माबाद- तालुक्यातील मौजे सिरजखोड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते, त्यानुसार गावकऱ्यांना तंबाखू मुक्तीची आणि स्वच्छतेची शपथ देण्यात आली आहे.
     यावेळी सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सरपंच श्री. गफारबेग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आझादी का अमृत महोत्सवा निमित्त नागरिकांना तंबाखू मुक्तीची व स्व्छतेची शपथ देण्यात आली. व त्यानंतर गट विकास अधिकारी श्री. कैलास बळवंत यांच्या हस्ते मातोश्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासोबतच “थोडंसं मायबापासाठी” या अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
     यावेळी गट विकास अधिकारी श्री.कैलास बळवंत, विस्तार अधिकारी आर. डी. जाधव, सरपंच मिर्झा गफारबेग, ग्रामसेवक श्री.गमे, रियाज अली, शामराव पोलीस पाटील,उपसरपंच खालेद बेग,ग्रा.प सदस्य दत्ताहरी  सज्जन,बाहोदिन यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या