Advertisement

Responsive Advertisement

निष्ठावंत शिवसैनिक हा कुठले पद अथवा सत्तेचा भुकेला नाही -युवासेना सचिव वरुण सरदेसाई


औरंगाबाद, दि. १९ (प्रतिनिधी) -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने प्रेरित होऊन असंख्य शिवसैनिकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. यामध्ये जेष्ठ शिवसैनिक स्वर्गीय पुंडलिक राऊत हे होते. शहराच्या नवीन वसाहतीमध्ये सेवा,सुरक्षा आणि पाठबळ देण्याचे काम त्यांनी केले होते. शिवसेनेचा जन्म हा सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे कुठल्याही पदासाठी अथवा सत्तेचा तो भुकेला नसतो.असे प्रतिपादन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.
पुंडलिकनगर भागातील जेष्ठ शिवसैनिक पुंडलिक राऊत यांच्या स्मारकास दिली भेट दिली,त्याप्रसंगी ते बोलत होते.
जनतेसाठी लढणाऱ्याच्या पाठिशी जनतेने ताकदीने आणि  भक्कमपणे उभे राहावे, त्यामुळे त्यांना या प्रेरणा मिळते, असे आवाहन त्यांनी केले. एका सामान्य शिवसैनिकाच्या नावाने पुंडलिकनगर ही वसाहत असून हिंदु रक्षणासाठी बलिदान दिलेल्या शिवसैनिकाचे जिल्ह्यात एकमेव स्मारक असल्याचे विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी सांगितले. यावेळी युवासेना उपसचिव ऋषीकेश खैरे, युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, माजी नगरसेविका मीना गायके, माजी नगरसेवक, मनोज गांगवे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख संतोष खेंडके, दिग्विजय शेरखाने, सागर खरगे, अभिजीत थाेरात, उपशाखाप्रमुख भरत ढवळे, विभागप्रमुख बापू कवळे, अल्पसंख्यांक आघाडी पूर्व संघटक अखिल शेख, दीपक परेराव, सिध्दार्थ वडमारे, विशाल गायके, स्वप्नील डिडोरे, जालींदर शिरसाट, राज नीळ, राजू चव्हाण, गणेश जैस्वाल, सागर वाघचौरे, बालाजी राऊत, विक्रांत पवार, मनोज बोरा, अमोल देशमुख, किशोर जाधव यांच्यासह शिवसेना युवासेना महिला आघाडी व अंगीकृत संघटना व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या