Advertisement

Responsive Advertisement

महसूल विभागाच्या निर्णयानुसार जुन्या वाहिवाटीचा शेतरस्ता पोलीस संरक्षणात खुला करा ? पळाशी येथील शेतकऱ्यांची मागणी..

 सोयगाव/विजय पगारे
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
 पळाशी ता.सोयगाव येथील काही समाजकंटकांनी शेतात जाणाऱ्या जुन्या वाहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. जुना पूर्वापार असलेला रस्ता महसूल आदेशानुसार पोलीस संरक्षणात खुला करण्याची मागणी पळाशी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार सोयगाव व जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.

पळाशी येथील शेतकरी जगन्नाथ शिंदे व बाबू महादू शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात पळाशी शिवारातील आमच्या मालकीच्या शेतात जाण्या येण्यासाठी जुन्यावाहिवाटीचा पूर्वापार रस्ता होता. या रस्त्यावर काही विघ्नसंतोषी लोकांनी हेतुपुरस्कर चाऱ्या काढून व नाल्यालगत अतिक्रमण करून रस्ता वापण्यास बंद केलेला आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना शेतात जाण्या व येण्यासाठी रस्ता नाही. पीक पेरणी, माशागत व पीक कापणी नंतर शेतीचा माल घेऊन गावाकडे येण्यासाठी रस्त्याविना लांबवरून वापरावे लागते. जुन्यावाहिवाट रस्त्याने वापरल्यास शिवीगाळ व मारहानीच्या धमक्या देण्यात येत असल्याने आम्ही महसूल विभाकडे चार वर्षापूर्वी पासून रस्ता मिळावा म्हणून दावा केला होता.
या प्रकरणी सोयगाव तहसील महसूल तर्फे उशिरा ता.१७/८/२०२२ ला निकाल मिळाला असून रस्ता देण्याचा आदेश पारित झाला आहे.
महसूल विभागाच्या आदेशानुसार आम्हाला पूर्वापार व जुन्यावाहिवाटिचा पोलीस संरक्षणात रस्ता खुला करून देण्याची मागणी पळाशी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार, तहसील कार्यालय सोयगाव, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सोयगाव,जिल्हाधिकारी, कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.
या निवेदनावर जगन्नाथ शिंदे, कलाबाई शंकर शिंदे, दत्तू महादू शिंदे व बाबू महादू शिंदे,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------------------------
– पूर्वापार जुनावहिवाटिचा रस्ता तात्काळ खुला न केल्यास सर्व शेतकरी मुलाबाळासह जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने प्राणांतिक पोषण करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या