Advertisement

Responsive Advertisement

मराठा आरक्षणासाठी हजारो मराठे एकवटले.


जालना -
आज महाकाळा येथील सिध्दश्वर मंगल कार्यालयात जालना जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या ४४ गावच्या वतीने प्रचंड मोठी बैठक पार पाडली आहे.

मराठा आरक्षण मिळवायचेच यावर अगोदर सर्वांचे एकमत झाले आहे आणि या पुढिल होणार्‍या प्रचंड मोठ्या, शक्तीशाली नियोजनबध्द आंदोलनाची तारिख हि प्रत्येक गावागावात जाऊन अगोदर प्रत्यक्ष बैठक द्यायच्या आणि आंदोलनाचे व्यापक नियोजन पक्के करायचे व या प्रचंड मोठ्या आंदोलनाची तारिख पुन्हा एकदा पंधरा दिवसांनी बैठक घेऊन, आंदोलनाची तारिख तातडीने जाहिर करायची व महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे असलेले आरक्षण मिळवून द्यायचेच, असे बैठकीला उपस्थित असणार्‍या हजारो मराठा बांधवांनी आज एकमताने ठरवले आहे.

आज महाकाळा येथिल सिध्देश्वर मंगल कार्यालयातील बैठकीत मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आणखी दोन्ही जिल्ह्यातील शेकडो गावे आंदोलनासाठी एकजूट करून, आंदोलन लगेच सुरू करायचे, असा ठाम निर्धारच उपस्थित हजारो जमलेल्या मराठा बांधवांनी आज केला आहे, आता मराठा समाजाला आरक्षणच मिळवून द्यायचे, त्याशिवाय माघार नाहीच, असा कणखर इशाराच सर्व मराठा बांधवांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या