Advertisement

Responsive Advertisement

मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजागाराभिमुख करण्याचा मानस -कौशल्यमंत्री मंगलप्रभात लोढा·

         औरंगाबाद,दिनांक 17 :  प्रधानमंत्री महारोजगारमेळाव्यांना मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत असून याप्रकारचे मेळावे यापुढेही आयोजितकरण्यात येणार असल्याची ग्वाही पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रीमंगल प्रभात लोढा यांनी दिली. कौशल्यपूर्ण रोजगाराचे शिक्षण देऊन मराठवाड्यातील प्रत्येकालारोजगाराभिमुख करण्याचा मानस श्री. लोढा यांनी बोलून दाखविला.             मराठवाडामुक्ती संग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीनेदोन दिवसीय प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता, अप्रेंटिसशिप व महारोजगार मेळाव्याचे  उद्घाटन श्री. लोढा यांच्याहस्ते झाले.  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मेळाव्यास सुरूवातझाली. औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून मुलाखती घेतल्या.याचप्रमाणे या मेळाव्याच्या ठिकाणी स्टार्टअप प्रदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन आणि करीअरसमुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्यास केंद्रीय वित्त राज्यमंत्रीडॉ. भागवत कराड, सर्वश्री आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकताआणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा, उप सचिव श्रीमती भरोसे,आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह, संचालक दिगंबर दळवी, उपायुक्त सु.द.सैंदाणे, सहायक आयुक्तसुरेश वराडे आदी उपस्थित होते.             राज्यातआगामी दोन वर्षात पाच लाख उमेदवारांना रोजगार अथवा स्वयंरोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीनेप्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.  कौशल्य पदवी प्रदान सोहळ्यात सर्व मान्यवरांनी पदवीदीक्षांत पोशाख घालून उमेदवारांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले. प्रातिनिधिक स्वरूपातपरम स्किल्स यांच्यामार्फत रुचा इंजिनिअरिंग इंड्यूरंस टेक्नॉलॉजी या कंपनीत अप्रेंटीसशिपम्हणून निवड झालेल्या पाच उमेदवारांना मंत्री लोढा यांच्या हस्ते निवड पत्र देण्यातआले.            रोजगारक्षमअभ्यासक्रमावर भर देऊन विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाडॉ. कराड, आमदार बागडे यांनी व्यक्त केली. मेळाव्याप्रसंगी श्रीमती वर्मा यांनी प्रास्ताविककेले. प्रदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. श्री. कुशवाह यांनी आभार मानले. *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या