Advertisement

Responsive Advertisement

सायबर भामटयाने सिमकार्ड बंद होणार आहे असा मेसेज पाठवून पळविलेले ४७ ९ ८६८ / - रूपये सायबर पोलीसांनी दिले परत मिळवून


 औरंगाबाद -
 आपण आधुनिक डिजीटल युगात वावरतांना किंवा मोबाईल , इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार किंवा समाजमाध्यमांचा वापर करतांना सतर्क राहणे गरजेचे आहे . आपण योग्य ती सर्तकता न बाळगल्यास अज्ञात भामटे आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून आपले आर्थिक , वैयक्तिक नुकसान करू शकतात . दिनांक ०८ / ० ९ / २०२२ रोजी महिला तक्रारदार राहणार पैठण , जि . औरंगाबाद यांनी पोस्टे सायबर येथे संपर्क करून माहिती दिली की , त्या शिक्षीका असून पैठण येथे वास्तव्यास आहेत . दिनांक ०८ / ० ९ / २०२२ रोजी त्यांना त्यांचे मोबाईलचे व्हॉटसअॅपवर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून त्यांचे बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड बंद होणार असून सिमकार्ड सुरू ठेवायचे असल्यास तात्काळ मेसेजमध्ये दिलेल्या कस्टमर केअरचे क्रमांकाशी संपर्क साधावा . तक्रारदार महिला यांनी मेसेज मधील दिलेल्या कस्टमरकेअरचे क्रमांकावर संपर्क केला असता . समोरील इसमाने त्यांना मी तुम्हाला ऑनलाईन केवायसी करून देतो असे सांगून तुम्ही तुमचे मोबाईलमध्ये क्युएस नावाचे अॅप डाऊनलोड करून त्यावरील क्रमांक सांगा . यावरून तक्रारदार यांनी नमूद क्युएस नावाचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करून क्युएस अॅपवरील क्रमांक समोरील इसमास सांगितला . तसेच तक्रारदार महिलेस तुम्ही तुमचे इंटरनेट बँकींग सुरू करून अगोदर ३ रुपयाचे टॉपअप रिचार्ज तुमच्या मोबाईलवर करा असे सांगून फोन कट केला . यावरून तक्रारदार महिलेने रिचार्ज केले . काही वेळाने तक्रारदार यांचे मोबाईलवर त्यांचे बँक खात्यातून रूपये ३,३ ९ ,८५८ / - व १,४०,०१० / - रूपयांचे असे एकूण ४,७ ९ , ८६८ / - रूपयांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार झाल्याचे दोन मेसेज दिसून आले . यावरून तक्रारदार महिलेस आपली काही तरी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले यावरून त्यांनी तात्काळ पैठण पोलीस ठाणे गाठून पोस्टे सायबर औरंगाबाद ग्रामीण येथे संपर्क केला . पोस्टे सायबर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमूद प्रकाराची माहिती घेवून तात्काळ तक्रारदार यांचे पैसे ज्याठिकाणी वापरण्यात आले होते . त्यासंबंधीत यंत्रणेस संपर्क साधला व तक्रारदार यांचे बँक खात्यातून झालेले व्यवहार तात्काळ थांबवून गेलेली रक्कम जागीच ब्लॉक करण्यास सांगितले . यावरून संबंधीत नोडल अधिकारी व यंत्रणनेने प्रतिसाद दिला व तक्रारदार यांचे खात्यातून गेलेली एकूण ४,७ ९ , ८६८ / - रूपये रक्कमेचे व्यवहार थांबवले तसेच नमूद रक्कम पैकी ३,३ ९ , ८५८ / - रूपये दिनांक ०१ / ० ९ / २०२२ रोजी तक्रारदार यांचे बँक खात्यातून परत मिळवून दिले तसेच उर्वरित १,४०,०१० / - रूपये रक्कम पुढील काही दिवसात नमूद तक्रारदार यांना रिफंड होणार आहे . नमूद प्रकारावरून पोस्टे सायबर येथे गुरनं , ४३ / २०२२ कलम ४२० भादवीसह कलम ६६ ( ड ) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयातील आरोपीतांबाबत माहिती घेवून पुढील अधिक तपास सुरू आहे . कोणाच्याही सांगण्यावरून Quick Suppport . Any Desk , ammyyadmin सारख्या रिमोट अॅक्सेस करणा या अॅप अज्ञाताचे सांगण्यावरून इन्स्टॉल करू नका त्यास अॅक्सेस देवू नका . कुठल्याही संदेशाबाबत अगोदर खात्री करा . असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण येथे संपर्क साधावा असे आवाहन . मनिष कलवानिया पोलीस अधिक्षक , औरंगाबाद ग्रामीण यांनी केले आहे . नमूद कामकाज मा . मनिष कलवानिया , पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण डॉ . श्री . पवन बन्सोड , अपर पोलीस अधिक्षक , औरंगाबाद ग्रामीण यांचे मार्गदर्शनानुसार श्री . अशोक घुगे , पोनि , सायबर , प्रविण पाटील , भारत माने पोउपनि , पोह / कैलास कामठे , संदिप वरपे नितिन जाधव , रविंद्र लोखंडे , सविता जायभाये , लखन पचोळे , योगेश दारवंटे , मुकेश वाघ सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या