Advertisement

Responsive Advertisement

वळण रस्त्यावर १२ जण घसरले निंबायती फाट्यावरील घटना...


सोयगाव/विजय पगारे
---------------------------
सोयगाव-बनोटी रस्त्यालगत असलेल्या निंबायती फाट्यावरील निमुळता वळण रस्ता आणि त्या रस्त्यात साचलेल्या चिखलात शनिवारी तब्बल दुचाकीवरून १२ जण घसरून किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी (१०) दुपारी घडली. आहे.दरम्यान पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारविरुद्ध ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. वळण रस्ता निमुळता केल्याने या रस्त्यावरून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
  सोयगाव-बनोटी रस्त्यालगत असलेल्या निंबायती गावाला जोडणी साठी नलकांडी पुलाचे काम निंबायती फाट्यावर सुरू होते,परंतु आठवडाभरापासून या नळकांडी पुलाचे बांधकाम बंद पडले असून या पुलाच्या बाजूने काढण्यात आलेला वळण रस्ता निमुळता झालेला असून नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसाने या वळण रस्त्यावर मोठा खड्डा तयार झालेला असून या खड्ड्यात चिखल साचलेल्या आहे. दरम्यान या खड्डेमय चिखलाच्या रस्त्यावरन दुचाकी आणि चारचाकी वाहने काढताना मोठी कसरत करावी लागत आहे, या वळण रस्त्यावर चिखल आणि खड्डा तयार झाल्यानें चिखलात दुचाकी वाहने घसरत आहे. शनिवारी तब्बल दुचाकी वाहने घसरून १२ जण किरकोळ जखमी झाले असून या घसरून पडलेल्यांची कपडे चिखलात भरली होती, दरम्यान या गावाला जोडणी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या नळकांडी पुलाचे कामही ठप्प झाले असून संबंधित ठेकेदाराने या नळकांडी पुलाच्या बाजूने काढलेल्या वळण रस्ताही नीट काढला नसून या अरुंद वळण रस्त्यावरून दुचाकी वाहने रस्त्याच्याखड्ड्यात कोसळत आहे..
संबंधित ठेकेदारावर पोलीस कारवाई करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांचा रोष अनावर झाला आहे.
---वळण रस्ता काढलेला नसतांना वाहनधारकांनी नळ कांडी पुलाच्या बाजूने स्वतःहून पर्यायी रस्ता काढला होता संबंधित ठेकेदार वळण रस्ता न काढता काम सुरू केले होते, त्यामुळे निंबायती कडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या