Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबादचे गतवैभव 'बीएसपी' परत मिळवून देईल-संदीप ताजनेऔरंगाबाद
राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराने गेल्या काळात आपले वैभव गमावले आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून करण्यात आला.परंतुबीएसपी चा प्रत्येक कॅडरने शहरावर येणारे संकटे परतवून लावेलअसे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष मा.अँड.संदीप ताजने साहेबांनी सोमवारी (१९ सप्टेंबर ) औरंगाबाद येथे आयोजित 'होऊ शकत हैंराज्यस्तरीय 'शासक बनोराज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमातून बोलतांना व्यक्त केले.यावेळी विचारपीठावर मा.प्रदेश प्रभारी मनिष भाऊ कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.

औरंगाबाद शहराला विशेष असे ऐतिहासिक महत्व आहे. सर्व समाज इथे गुण्यागोविंदाने नांदतात. परंतुराजकीय फायद्यासाठी काही प्रादेशिक पक्ष शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नात आहे.या समाजविघातक प्रवृत्तीला प्रत्युत्तर देण्यासाठी 'सर्वजण हितायसर्वजण सुखायसमाज निर्मितीचा उद्देश बसपाचा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसपा ला मोठ्या संख्येत प्रतिनिधित्व द्या,असे आवाहन यावेळी मा.अँड.ताजने साहेबांनी केले.

 

सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सज्जा व्हानिवडणुकीच्या तयारीला लागा आणि पक्ष संघटनाला बळकटी द्या असा कानमंत्र अँड.ताजने साहेबांनी यावेळी कॅडरला दिला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बसपा स्वबळावर लढवणार आहे.औरंगाबाद मध्ये पार्टीचा विशेष असा जनाधार आहे. याच जनाधारावर आणि कॅडरच्या मेहनतीच्या बळावर मोठ्यासंख्येत नगरसेवक निवडून येतील,असा विश्वास अँड.ताजने साहेबांनी व्यक्त केला.


'रख होसलालढ बुराई से... 'होऊ शकत हैंके विश्वास के साथ...

बढ आगेसंघर्ष करना तो कॅडर की फित्रत हैं...

और हर मुसीबत मे तो पार्टी तेरे साथ हैं...'

अशा शब्दांमध्ये अँड.ताजने यांनी कॅडरचा उत्साह वाढवला.

कार्यक्रमात प्रदेश महासचिव मा.पंडितदादा बोर्डे,मा दिगंबर ढोलेप्रदेश सचिव प्रभात खिल्लारे सचिन भाऊ बनसोडेमा.कैसर कुरेशीमा.जगदीश बेडवेमा.संजय वाघमारे मा.किशोर मस्केमा.बापू बनसोडेप्रदेश सदस्य मा.नदीम चौधरी,जिल्हा अध्यक्ष मा. समाधान जाधवशहर अध्यक्ष मा.आय्युब पटेलजिल्हा प्रभारी मा.योगीराज आनंदमा बाबासाहेब पगारेमा.अक्रम शेखजिल्हा उपाध्यक्ष मा.शंकर मामा चोथे जिल्हा महासचिव मा.विजय बचकेजिल्हा सचिव मा. अमोल पवारमा.राहुल निकममा.कुणाल लांडगेजिल्हा संघटक मा.सोहेल खान,शहर महासचिव मा.अल्ताफ खान तसेच सर्व विधानसभा मतदार संघातील पदाधिकारीकार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या