Advertisement

Responsive Advertisement

स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडू गणपतराव पाटील डोळसे यांचा गंभीर इशारा


धर्माबाद- संपूर्ण महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या समस्येकडे जर जाणून-बुजून दुर्लक्ष केल्यास शासनाच्या विरोधात तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडू असा गंभीर इशारा ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी बासर तीर्थक्षेत्रावर महाराष्ट्र शासनास दिला.
ऑल महाराष्ट्र फेयर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन तथा नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नांदेड तर्फे आयोजित महाराष्ट्र कार्यकारणी बैठक व जिल्हा मेळावा काल धर्माबाद पासून जवळच असलेला तेलंगाना राज्यातील सरस्वती देवीचे पवित्र स्थान असलेल्या मौजे बासर तीर्थक्षेत्रावर संपन्न झाला.
उपरोक्त महाराष्ट्र व्यापी कार्यकारणी बैठक व नांदेड जिल्हा मेळाव्यात महाराष्ट्रातील 18 जिल्हाध्यक्ष व नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
सदरील महाराष्ट्र कार्यकारणी बैठक व जिल्हा मेळाव्यात अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी सर्व रास्त धान्य दुकानदारांच्या समस्या सुरुवातीला ऐकून घेतल्या‌ त्यामध्ये प्रामुख्याने इपॉस मशीनची डोकेदुखी, त्यास सतत अखंडित होणारे नेटवर्क, शासनातर्फे जो स्वस्त धान्यांचा पुरवठा होतो त्या प्रत्येक पोत्यात किमान दोन ते तीन किलो धान्य कमी येणे, वाहतूक खर्चाचा अतिरिक्त भार ठेकेदार दुकानदारावरच टाकणे, सुतळीचा खर्चही न देणे व सुरळीत दर महिन्याला धान्य पुरवठा होणे अशा महाराष्ट्र व्यापी समस्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या होत्या. त्या समस्या ऐकून घेऊन महाराष्ट्र अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी या समस्या तात्काळ जर मार्गी लागल्या नाहीत तर महाराष्ट्र व्यापी आंदोलन छेडू असा गर्भगळीत इशारा दिला.
हा महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम बासर तीर्थक्षेत्रावर आयोजित करण्यात धर्माबादचे तालुका अध्यक्ष साईनाथ उर्फ बाबू गोरजे व बिलोली चे तालुका अध्यक्ष संतोष पाटील बामणे यांनी पुढाकार घेऊन अथक परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्यामुळे महाराष्ट्र सह जिल्ह्यातून आलेल्या सर्व स्वस्त धान्य दुकानदार व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या