Advertisement

Responsive Advertisement

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या दौऱ्यात युवासैनिकांनी सहभागी व्हा -युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे यांचे आवाहन


औरंगाबाद, दि. १७ (प्रतिनिधी) - संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे नागरिक येथे आहे. यामुळे हा बालेकिल्ला भक्कमपणे आजही शिवसेनेच्या पाठिशी आहे. पार्श्वभूमीवर १८ व १९ सप्टेंबर रोजी दोन दिवस युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा दोन दिवस संभाजीनार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यास युवासैनिकांनो मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे यांनी केले.
रविवार, १८ सप्टेंबर
रोजी सायंकाळी ५ वाजता चिकलठाणा येथे युवासेना शाखेचे उदघाटन ( फुलंब्री विभाग) तर सायंकाळी ६ वाजता टीव्ही सेंटर येथे युवासेना शाखेचे उदघाटन ( मध्य विभाग) युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते होणार आहे.
सोमवार, १९ सप्टेंबर रोजी 
सकाळी ९ वाजता पिंप्रीराजा येथे युवासेना शाखेचे उदघाटन ( पैठण विभाग) तर
१० वाजता आडूळ येथे शाखेचे उदघाटन न युवासेना निर्धार मेळावा  होईल. त्यानंतर  दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरुंना देण्यात येणार आहे.
दुपारी १ वाजता टॉक विथ वरुण हा  विद्यार्थी सवांद आणि त्यानंतर २ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमास शिवसैनिक, युवासैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे युवासेना जिल्हा युवाअधिकारी हनुमान शिंदे, मॅचिंद्र देवकर पाटील, शुभम पिवळ आणि कैलाश जाधव यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या