Advertisement

Responsive Advertisement

घाटीतील विविध गंभीर समस्यांबाबत वारंवार तक्रारींचे निवेदने देवूनही समस्यांचे निराकरण न करणार्या अधिष्ठातांवर कारवाईची मागणी ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन सादर


औरंगाबाद (प्रतिनिधी):- शासकीय वैद्यकीय रुग्णालय, औरंगाबाद (घाटी) हे गोरगरीब जनतेला उपचार घेण्यासाठी मराठवाड्यातील एक मुख्य रुग्णालय म्हणून ओळखले आहे. परंतु सदरील शासकीय रुग्णालयामध्ये विविध अशा बNयाच गंभीर स्वरुपांच्या समस्या आहेत. जसे की, प्रसुती विभाग व लहान मुलांच्या वार्डासंबंधी, रुग्णालयातील अस्वच्छता, कर्मचाNयांची दादागिरी अशा अनेक गंभीर समस्यासंदर्भात आम्ही आपल्या पक्षातर्पेâ वारंवार मा. अधिष्ठाता यांची प्रत्यक्ष भेट घेवून तसेच निवेदने देवूनही अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, उलट मा. अधिष्ठाता डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, सदरील समस्यांचे निराकरण हे माझ्याकडून होणार नाही त्यामुळे तुम्ही माझी वरिष्ठांकडे तक्रार करू शकता विंâवा माझ्या बदलीसाठी तक्रार करू शकता, करिता शासकीय वैद्यकीय रुग्णालय औरंगाबाद (घाटी) येथील विविध समस्यांचा हा एक मोठा गंभीर विषय बनलेला असून लवकरात लवकर विधानसभेत मांडून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष डॉ. मयुर सोनवणे, युवा शहर कार्याध्यक्ष कय्युम शेख, जिल्हा शहर उपाध्यक्ष मुख्तार खान यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या