Advertisement

Responsive Advertisement

गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा : शिवसेना नेते चंद्रकांत खैर



औरंगाबाद : संभाजीनगर जिल्ह्यात एकही शिवसैनिक फुटला नाही, फुटले ते गद्दार. या गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
संभाजीनगर शहर युवासेना नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकारी जिल्हा समनव्यक दत्ता शेलार, उपजिल्हा युवाधिकारी प्रकाश धुर्वे, शहर युवधिकारी स्वप्निल दिंडोरे, आदित्य दहिवाळ, रामेश्वर कोरडे, शहर समनव्यक विशाल सानप, भागीनाथ रिठे,  चिटणीस मनोज क्षीरसागर, देविदास रत्नपारखी, उपशहर चिटणीस साईनाथ थोरवे, उपशहर अधिकारी नितेश थट्टेकर, समाधान बनकर, आकाश पोळ, शुभम साळवे, सागर राऊत, किरण गायकवाड, साहिल लहाने, ऋषिकेश तोरणमल यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या