Advertisement

Responsive Advertisement

उंदराचा जिव जातो" मात्र " मांजरीचा खेळ होतो " ----------------३०/५४ तिर्थक्षेत्र विकास व्हावा उद्देशाने सुरू केलेल्या कामात ठेकेदाराचे चांगभले, तर " अधिकारी तुपाशी " जनता मात्र उपाशी " ...

सोयगाव / विजय पगारे
~~~~~~~~~~~~
शासनाच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून जनतेच्या मागणीनुसार सोयगाव तालुक्यातील तिर्थक्षेत्र रूद्रेश्वर , घटोत्कच लणीचा विकास व्हावा म्हणून प्रर्यटकांना लाभ घेने सोईस्कर होण्यासाठी ३०/५४ हेड अंतर्गत खडीकरण,मुरुम तर डांबरीकरण काम करण्यात येत आहे.मात्र जनतेने जनतेसाठी चालविलेल्या देशात सहनशीलता असल्याने या रस्त्याच्या कामात कुचराई करीत अधिक नफेखोरी मिळवण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे करून संबंधित एजंन्सी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कामाचे बिल काढून ठेकेदाराचे चांगभले होतयं, यात अधिकारी तुपाशी तर जनता मात्र उपाशी राहण्याची वेळ आली आहे. जनतेचा जिव जातो,मात्र अधिकाऱ्यांचा खेळ होतोयं.
----
औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत जि.प. बांधकाम उपविभाग सिल्लोड येथील कल्याण भोसले,जि.प.कनिष्ठ अभियंता राजेश राजगुरू यांचा निगरानित देखरेख अंतर्गत काम होत नसुन निमित्त मात्र धावतीभेट देत असल्याने रुद्रेश्वराचे १५ लक्ष रुपयाचे कामे, तीन ते चार लाखात उरकण्याचा सपाटा लावल्याचे दिसुन आले, या विषयी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक ईश्वर इंगळे, रविंद्र काटोले, संदिप इंगळे,दतात्रय काटोले आदींनी या होत असलेल्या कामांबाबत जि.प.औरंगाबाद बांधकाम विभागसह,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रारी निवेदन देवून संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी रास्त मागणी केली आहे.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷बाॅक्स : ->
°°°°°°°°°
हा बबलु हाजी. कोण ?
राज्यचे कृषीमंत्री अ. सत्तार यांच्या नावाचा सर्रास वापर करुन "  मैं सत्तारसेठ का भतीजा हू ...! म्हणत सिल्लोड सोयगाव मतदार संघात शासकीय अधिकारी यांच्यावर दडपशाही चा वापर करून, दुसऱ्या च्या एजंन्सी नावे शासकीय कामांची गुप्तेदारी करनारा, "हज मक्कामदीना " करुन आल्यानंतरही अधिक नफेखोरी,सतत खोटे बोलुन जनतेच्या हीतासाठी होनाऱ्यां कामांत डल्ला मारणारा हा बबलु हाजी नेमका कोण ? असा यक्ष प्रश्न जनतेस पडला आहे.
-----------


तिर्थक्षेत्र वेताळवाडी ते रूद्रेश्वर दोन की.मी.रस्ता खडीकरण, ५ पुलं बांधकाम,व घटत्कोच रस्ता खडीकरण-मुरुम ३ पुलांचे अंदाजपत्रकात आमच्या कार्यालयात आहेत,आम्ही काम पुर्ण झाल्यावर कामाची माहिती दर्शवनारा फलक लावतच असतो.सर्वसामांन्य जनतेला अंदाज पत्रकाची काय गरज जेसे काम होत आहे तसे होवू द्या...! अन्यथा कामं बंद करु...

राजेश राजगुरू
जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता
------------------

शासनाच्या जि.प.विभागाअंतर्गत दोन्ही काम सुरु आहेत . मी कनिष्ठ अभियंता राजगुरू यांना अंदाजपत्रकात तुम्हा प्रतिष्ठित नागरिकांना देण्यासाठी सांगतो.

कल्याण भोसले
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या