Advertisement

Responsive Advertisement

सोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी " मारल्या सारखे करतो " " तुम्ही रडल्या सारखे करा...?


सोयगाव/विजय पगारे
~~~~~~~~~~~
शासनाची राॅयल्टी वाहतुक परवाना नसतांना घटोत्कच पांदी रस्त्यावर विना नंबर चे जेसीबी,चार ट्रॅक्टर व ट्राॅलीच्या सहाय्याने गौण खनिजाची रविवारी (ता.४) वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी,महसुलचकव्यांना कायद्याचा जरब बसावा म्हणून सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांना स्थानिक नागरिकांनी माहिती दिली असता कारवाई तर सोडा गौण खनिज विभागाचा एकही अधिकारी साधा डोकावला सुद्धा नाही.
---
गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असुन त्यांना महसुल विभागाच्या गौण खनिज विभागातील अधिकाऱ्यासह सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत हे चेरीमेरी घेऊन पाठराखण करीत असल्याने शासनाचा लाखो रुपयाचा महसुल हा गिळंकृत होत आहे.
रविवारी वाहतुकीची परवाना नसतांना नंदलाल पंडीत यांच्या मालकीच्या जेसीबीच्या सहाय्याने दिवसाढवळ्या राजरोसपने घटत्कोज लेणी परिसरात उत्खनन करुन ४ विना नंबरचे ट्रॅक्टर-ट्राॅली ने याच रस्त्यावर नळकांड्या पुल कामासाठी सर्रास वापर होत असल्याचे सोयगाव तहसीलदार जसवंत,गौण खनिज विभाग नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, वरिष्ठ लिपिक शरद पाटील यांना स्थानिक नागरिकांनी माहिती दिली असता.दंडात्मक कारवाई न करता मी कारवाई करण्यासाठी याला व त्याला पाठवतो म्हनत वेळ मारुन नेली कारवाई मात्र झालीच नाही.तर महसुल विभातीत पाठराखण करणऱ्या एका अधिकाऱ्याने गौण खनिज व्यवसाईकास भ्रमणध्वनी वरुन त्वरीत निसटण्यासाठी सांगण्यात आले. कामचुकार व चेरीमेरी वृत्ती वाढल्लाने शासनाच्या लाख्खो रुपयाचा महसुल बुडत आहे.
---------------------------------------------------
******
आपल्या लेखनातून समाजासाठी रक्ताची शाही करुन शासनहीत जपनाऱ्या पत्रकार ईश्वर इंगळे यास (१७ जुलै) रोजी गौण खनिज व्यवसाईकाकडुन मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने मारहाण ही करण्यात आली, म्हणून या प्रकरणी पत्रकार स्वरक्षण कायद्यान्वये पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला, पुढे काय ? आरोपी अमोल मीरे जमानत वर सुटला, पुन्हा व्यवसायात सक्रिय झाला.वाळू माफीया,गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचे लागेबांधे थेट अधिकाऱ्यांशी असल्याने योग्य कारवाई झालीच नाही म्हणून १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय समोर पत्रकारांनी आंदोलनही केले, आंदोलन जिरडण्यासाठी थातुरमातुर लेखी आश्वासन दिले मात्र आजतागायत कठोर व कायमस्वरुपी माफीयांनवर कारवाई होत नसल्याने दोन नंबरचे व्यवसाय फोफावले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या