Advertisement

Responsive Advertisement

माँसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा मंगळवार, ६ रोजी स्मृतिदिन ,गुलमंडी येथे भावपूर्ण आदरांजलीचा कार्यक्रम

औरंगाबाद ५ - तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा ६ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्रभर स्मृतिदिन म्हणून साजरा करून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.यानिमित्त  शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीने गुलमंडी येथे मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता भावपूर्ण आदरांजली वाहून भावभक्ती गीतांचा कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून आलाप प्रस्तुत सरला शिंदे व सहकाऱ्यांच्या साथीने भावगीतांचा कार्यक्रमा होईल.
 यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख त्रंबक तुपे, महानगरप्रमुख माजी आमदार किशनचंद तनवाणी, आमदार उदयसिंग राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, पश्चिम तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, महिला संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा समनव्यक माजी महापौर कला ओझा, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, राखी परदेशी यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, राजू राठोड, बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, बाप्पा दळवी, विधानसभा संघटक राजू वैद्य, सुशील खेडकर, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे यांच्यासह तमाम शिवसैनिक व युवासैनिक आणि महिला आघाडी पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या