Advertisement

Responsive Advertisement

कविनी समाजासाठी लेखनी झिजवावी प्रा. शिवाजीराव हुसे यांचे प्रतिपादनभराड़ी - सिल्लोड तालुक्यात साहित्यची मोठी परंपरा  असून तिला वृद्धिगंत करण्याचा प्रयत्न नव कवी करीत आहेत. कविनी समाजातिल परिवर्तनासाठी लेखनी झिजवावी.कवितेकडे केवळ साहित्य म्हणून न पाहता कवितेच्या माध्यमातून सामजिक प्रश्न मांडावे, वाचा फोड़ावी यासाठी समाजातील शेतकरी, कस्टकरी, रंजल्या -गांजल्याशी नाळ जोडून ठेवावी असे प्रतिपादन प्रा. शिवाजीराव हुसे यांनी भराड़ी येथील ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व शिक्षणमहर्षि कै. हिम्मतराव (भाऊ) गरुड़ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 'फकीरा ग्रामीण कवी सम्मेलन आयोजित केले होते.
                 या  कार्यक्रमाचे उदघाटन 'तिफन' त्रेमासिकचे संपादक  प्रा.शिवाजी हुसे  यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी, साहित्यिक श्री. समाधान इंगळे हे होते.प्रमुख अतिथि म्हणून स.पो.नी. मा. नालंदा लांडगे, व ज्येष्ठ साहित्यिक, कवी नारायण खेडकर, दिपक सोनवने, सुरेश घोंगडे, देवीदास तुपे हजर होते.उपस्थितांचे स्वागत श्री. नानासाहेब गायकवाड़ (तालुकाध्यक्ष -मानवहित पक्ष )व संस्थाप्रमुख अशोकदादा गरुड़ यांच्या हस्ते  करण्यात आले.
               यावेळी जिल्हाभरातील नामांकित कवींची ओळख, प्रत्यक्ष भेटिची संधी तसेच वाचनातून प्रेरणेसह, भरपूर कविता ऐकून मंत्रमुग्ध होण्याची संधी यावेळी विद्यार्थियांना मिळाली.उपस्थित सर्वच क़विन्नी विद्यार्थियांचे आपल्या काव्यरचनेद्वारे  यांचे  मनोरंजन केले.

 

  कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान इंगळे म्हणाले की,कविता सहजपने लिहिल्या जात नाही.  बाहेर कितीही प्रकाश असेल आणि जर ह्रदयात अंधार असू नये. आणि तो अंधार फ़क्त गुरुजन मीटवू शकतात. संत कबीर कबीरांचे उदाहरण देत ते म्हणाले की,तुम्ही आयुष्यभर अभ्यास किती करता, तुम्ही पैसे किती कमावता हे महत्वाचे नसून तुमचे समाजातील आचरण कसे हे महत्वाचे ठरते. शिक्षणाने दारिद्री  व अज्ञान दूर होते म्हणून ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असे अण्णाभाऊ साठे म्हणाले होते. म्हणून जगाचा केवळ अभ्यास न करता जग बदला साठी विचार करा असेही ते शेवटी म्हणाले.

तदनंतर संस्थाचे प्रमुख श्री. अशोकदादा गरुड़ यांनी कविता हा समाजाचा व मानवाचा अलंकार असतो. प्रत्येक कविचे नवश्रुजन रसिकांसमोर शेअर करण्यापेक्षा मोठा आनंद कोणता असेल ? परंतु ते व्यक्त होण्यासाठी अशा संमेलनाची गरज असते. गाणे स्वरूपाचे आदिम रूप आजही कायम आहे.गीत हे सामूहिक आनंदोत्सवाच माध्यम आहे म्हणून अशा कार्यक्रमांना वाचकांपेक्षा श्रोत्यांची संख्या नक्कीच जास्त असते. म्हणून कवी म्हणजेच विचारवंत, आदर्श व्यक्ति असा समज आजही समाजात रूढ़ आहे.तसेच विद्यार्थी यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून कवी संमेलने असल्याचे मत व्यक्त केले.

कवी, कवयित्रीनी शेती, शिक्षण, सामाजिकता, आरोग्य, राजकारण, मानवता, महामानव,आदि विषयावर प्रकाश टाकणारया कविता सादर केल्या.

 आभार नानासाहेब गायकवाड यांनी मानले.
                  कार्यक्रमासाठी कवी सुनील उबाळे, दौलत भारती, अमोल भीलंगे, श्रीकृष्ण बड़क, काशीनाथ शेजुळ, सोमीनाथ सोनवणे, चंद्रभारती भारती, बद्रीनाथ भालगड़े, गजानन गायकवाड़, दामोधर मोरे, गीतांजलि गजभिये, सुभाष काकड़े, साईनाथ फुसे, सुरेश कायटे, योगेश कोंडके, श्री.विशाल, पंडित वराडे,श्रीमती काळे, श्रीमती मोरे,
यासह  प्रशांत गायकवाड़,श्री.भूसारे , श्री महाजन बाबा,चाँद भाई, विट्ठल पूरी,संदीप देशमुख,उमेश नेव्हारे नेव्हारे, वैष्णवी शिंदे,अरुण शेळके उपस्थित होते.

यांच्यासह ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, शालेय वाहन चालक मालक यांची उपस्थिति होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या