Advertisement

Responsive Advertisement

चंद्रकांत खैरेंचे दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे ,सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंचा विजय होवो, धनुष्य बाणासहित हीच खरी 'शिवसेना' ठरो


पुणे :- शिवसेना प्रमुखांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. गणराया, उद्धव ठाकरेंना न्याय देऊन धनुष्य बाणासहित त्यांचा विजय होवो अशी प्रार्थना शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी केली आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना 23 सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली होती. मात्र शिवसेना कुणाची याबाबत अजून निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पुण्यात श्रीमंत दगडुशेट हलवाईच्या बाप्पाचे दर्शन घेत सत्तासंघर्षाची लढाई जिंकण्यासाठी नवस मागितला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे. गेली ५० वर्षे मी याठिकाणी येत आहे. आज जे चांगले दिवस आले आहेत ते उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात केलेल्या कामामुळे आहे. त्यांनी कोरोनात केलेल्या विविध उपाययोजनांमुळेच आज आपण सण-उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरे करु शकत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
यावेळी पुढे बोलतांना खैरे म्हणाले, आम्ही सर्व शिवसैनिक आहोत. नेता जरी असलो तरी मी देखील सर्वप्रथम शिवसैनिकच आहे. सत्तासंघर्षाचा २७ तारखेला निकाल आहे. याच पार्श्वभूमीवर आज गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे की, आता घटनापीठ झालेले आहे. उद्धव ठाकरेंना न्याय मिळावा. धनुष्यबानासहीत त्यांचा विजय व्हावा. शिवसेनाप्रमुखांची हीच खरी शिवसेना आहे. आणि ती उद्धव ठाकरेंचीच राहावी. हेच गणपती बाप्पाला साकडे. असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या