Advertisement

Responsive Advertisement

महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबईदि. 1 : महाराष्ट्राला कलासंस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही.  कलाकारांच्या  चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते.  साहित्य, कला यातून  साकारलेले समृद्ध विचार आपण कधीच खोडू शकत नाही. ते कायमस्वरूपी मनात राहतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मुंबईत जहांगीर कला दालनात भरविण्यात आलेल्या ‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी माजी आमदार राज पुरोहितमाजी खासदार विजय दर्डासौ. अमृता फडणवीसकलाकार जयश्री भल्लारचना दर्डाबीना ठकरार, लोकमत वृत्तपत्र मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णीज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, अनेक कलाकार उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकलासंस्कृतीचालीरिती यावरून त्या त्या राज्याची ओळख असते. चित्रप्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते कीकिती समृद्ध विचाराने ह्या चित्रकथा रेखाटलेल्या आहेत. कलाकार आपल्या कलेतून  कलासंस्कृती जपत असतो. त्याची किंमत करता येत नाही. याठिकाणी चार कलाकारांनी एकत्रित या प्रदर्शनात विविध चित्रकथा रेखाटलेल्या आहेत.

            माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह वास्तुविशारद जयश्री भल्लाछायाचित्रकार रचना दर्डा आणि बीना ठकरार यांनी रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

            माजी खासदार श्री.दर्डा म्हणालेया प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दि. ५ सप्टेंबरपर्यंत  सुरू राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या