Advertisement

Responsive Advertisement

मुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश


धर्माबाद-शहरातील उर्दू एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व मुख्याध्यापक शाळेतील कनिष्ठ लिपिक शेख रफीयोद्दीन अलीमोद्दीन यांना त्यांच्या कर्तव्यात कोणताही कसूर नसतात देखील केवळ आर्थिक व मानसिक शोषण करण्याच्या उद्देशाने सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली असून या तक्रार अर्जाची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेत प्रकरणाचा निवाडा करण्यासाठी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे रेफर केले असून त्या आशयाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार(सामान्य)यांच्याकडुन काढण्यात आले आहे.
 शहरातील उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म.जावेदोद्दीन  व मुख्याध्यापक म.आझरोद्दीन हे सखे भाऊ आहेत. या संस्थेत कर्तव्यावर असणारे कनिष्ठ लिपिक शेख रफीयोद्दीन अलीमोद्दीन यांच्या सेवाकार्यात व कर्तव्यात कोणताही कसूर नसतांनाही त्यांना जाणीवपूर्वक सुड भावनेतून मानसिक त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणे समोर करून आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न केला गेला.या प्रकारास ते जुमानले नसल्याने त्यांना नौकरीतून कमी करण्याची धमकी देण्यात आली,तसेच कोणतीही पूर्व कल्पना न देता 2022-2023 वर्षांची पगार वाढ थांबविण्यात आली.संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्या त्रासाने ते आजारी पडले त्या दरम्यान त्यांनी नातेवाईकांनार्फत वैद्यकीय रजा पाठविली मात्र ती मंजूर करण्यात आली नाही तसेच आता परत सेवेत रुजू करून घेतल्या जात नाही. अशा प्रकारचा आरोप अर्जदाराने लेखी निवेदनाच्या माध्यमातून मा.जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्याकडे केला आहे.  विशेष म्हणजे ते कर्तव्यावर शाळेत रुजू झाल्यापासून कामात शिस्तबद्ध आहेत.संस्थेच्या मुख्याध्यापकानी याबद्दल 23-1-2020 सेवाकाळ समाधानकारक असल्याचे शिक्षण अधिकारी यांना कळविले त्यानंतरच सेवासातत्यासहित मान्यता देण्यात आली होती हे विशेष.
   उपरोक्त प्रकरणी होत असलेल्या त्रासातून मुक्तता व्हावी व सेवेत सामावून घेण्याची मागणी कनिष्ठ लिपिक शेख रफीयोद्दीन अलमोद्दीन यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती त्या अर्जाची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेत माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी याबाबतीत चौकशी करून योग्य तो निवाडा करण्याचे सांगितले आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. या विषयावर शिक्षण विभागाने कायमस्वरूपी प्रभावी तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे

 नौकरीवरच माझी व माझ्या कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालतो,संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांना वारंवार विनंती केली पण ते ऐकून न घेता माझ्यावरच धमकी व दबावतंत्र वापरत आहेत.त्यामुळे नाईलाजाने वरिष्ठांकडे दाद मागितली आहे.माझ्या कर्तव्यात व सेवाकाळात कोणताही कसूर नाही त्यामुळे मला न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया कनिष्ठ लिपिक शेख रफीयोद्दीन अलमोद्दीन यांनी व्यक्त केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या