Advertisement

Responsive Advertisement

रामदास कदमांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवसेनेची तीव्र निदर्शने


औरंगाबाद : ज्या ठाकरे कुटुंबियांनी सर्वसामान्य शिवसैनिकांना असामान्य पदापर्यंत पोहचवले. आमदार, मंत्री आणि नेते बनवले, मुलांना आमदार केले, असे गद्दार रामदास कदम ठाकरे कुटुंबियांवर गरळ ओकत आहे. हे नमकहराम उपकार विसरल्याने त्यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसेना संभाजीनगर पूर्व विधानसभेच्यावतीने गजानन मंदिर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी या गद्दारांचे करायचे काय, खाली मुंडक वर पाय!
गद्दार रामदास कदम, हाय हाय! नीम का पत्ता कडवा है, रामदास कदम भडवा है, या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, विधानसभा संघटक राजू वैद्य, सुशील खेडकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, संतोष खेडकें, वामन शिंदे, कृष्णा मेटे, शिवा लुंगारे, 
माजी नगरसेवक सूर्यकांत जायभाये, आत्माराम पवार, महिला आघाडीच्या नलिनी बाहेती, विद्या अग्निहोत्री, मीना गायके, मीरा देशपांडे, पद्मा तुपे, अनिता खोंडकर, मीना पांडे,  सीमा गवळी, अल्पसंख्याक आघाडी शहरप्रमुख अखिल शेख, विभागप्रमुख राजू चव्हाण, बापू कवळे, पुरुषोत्तम पानपट, सोपान बांगर, अजय गटाने, नंदू लबडे, दीपक सूर्यवंशी, शाखाप्रमुख चंद्रकांत देवराज, राम केकान, कैलास तिवळकर, जालिंदर शिरसाठ, प्रशांत डिघुले, नितीन अजमेरा, मंगेश वाधवनी, विनोद पवार, संदीप शिंदे, सूर्यकांत सूर्यवंशी,भरत ढवळे, ईश्वर शिंदे, शंकर शिंदे, सिद्धार्थ वडमारे, रामदास गायके, संदीप अहिरे, लक्ष्मण बताडे, बंटी कचकुरे, धर्मराज गवळी आदींसह शिवसैनिक, युवसैनिक आणि महिला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या