Advertisement

Responsive Advertisement

चिकाटी व भूमिका स्पष्ट असेल तर वृत्तपत्रांना मरण नाही प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे यांचे प्रतिपादन


औरंगाबाद /प्रतिनिधी
 वर्तमान पत्राच्या संपादका कडे चिकाटी व स्पष्ट लोकहितवादी वैचारिक भूमिका असेल तर वृत्तपत्रे बंद पडू शकत नाहीत. वैचारिक अधिष्ठाण मजबूत असेल तर वृत्तपत्राना मरण नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी समाजभूषण वितरण सोहळ्यात बोलताना केले. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र सभागृहात शनिवारी निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध अस्थि रोगतज्ञ व विचारवंत डॉ. चंद्रकांत थोरात  यांनी भूषवले. यावेळी विचारपीठावर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रॉपेसर डॉ.सिद्धार्थ जोंधळे, डॉ चंद्रकात थोरात, श्रावणदादा गायकवाड, उमेश नागदेवे, भिखुनी प्रा. धम्मदर्शना महाथेरी, अनिलकुमार निंभोरे,अँड. धनंजय बोरडे,विनय घनबहादूर, नंदाताई गायकवाड,आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे पुढे  बोलताना म्हणाले की वृत्तपत्राची खरी ताकद काय असते हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ठाऊक होते. स्‍वराज्‍याची भूमिका मांडणारे लोकमान्य टिळकांच्या मनातून जात कधीच गेली नाही. महात्मा फुले यांचे निधन झाले तेव्हा टिळकांनी महात्मा फुले विषयी एक ओळही लिहिलेली नाही. याची सल बाबासाहेबांच्या मनात राहिली.१९२० साली मूकनायक हे वृत्तपत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरानी सुरु केले. आणि याच वर्षात टिळकाचे निधन झाले. तेव्हा पुण्याचे टिळक गेले एवढी एकच ओळ छापून टिळकांचा वचपा काढला. वृत्तपत्रात किती ताकद आहे. ते बाबासाहेबांनी दाखवून दिले . पुढे बोलताना प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी नमूद केले की प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील निळे प्रतीक हे वृत्तपत्र गेली बारा वर्षे सुरू आहे.कारण स्पष्ट भूमिका हे या वृत्तपत्राचे वैशिष्ट्य आहे. हे वृत्तपत्र साप्ताहिक स्वरूपात असले तरी या वृत्तपत्राचे रूपांतर आता दैनिकात व्हावे. अशी अपेक्षा प्रा.
डॉ.कांबळे यांनी व्यक्त केली. उद्घाटनपर भाषणात तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिझर्वेशन दिले त्यामुळे आपल्या समाजातून अनेक अधिकारी निर्माण झाले. डॉ बाबासाहेबांचे हे योगदान विसरता येण्यासारखे नाही. आज नोकऱ्या कमी होत आहेत,रिझर्वेशन हे हळूहळू कमी होत आहे. त्यासाठी सोशल मोमेंट उभी करावी लागेल. असे नमूद करून नागदेवे म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकराना  लोक घाबरायचे यामागील सत्य बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. कठोर शील संवर्धन व कुठेही न झुकण्याची, न विकण्याची प्रवृत्ती, यामुळे बाबासाहेब महान ठरलेले आहेत. निळे प्रतीक हे दैनिक व्हावे.अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आंबेडकरी चळवळीतील श्रावण गायकवाड यांनी आपल्या तडाखेबंद भाषणातुन सभागृहात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.जातीअंताची चळवळ व ध्यास सर्वात महत्त्वाचा असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. संपादक रतनकुमार साळवे यांनी मागील बारा वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यकारी अभियंता अनिल कुमार निंभोरे, त्रीनिती बोर्ड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जोंधळे अँड.धनंजय बोरडे,नंदाताई गायकवाड आदीं मान्यवराची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार स. सो.खंडाळकर, रतनकुमार पंडागळे, व्ही के वाघ, एस आर. बोदडे,पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे, बाबुराव जुमडे, राहुल साळवे, डॉ. प्रवीण रणवीर,शांतीलाल दाभाडे आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ,मुकुंद दादा सोनवणे,डॉ.चंद्रकांत थोरात विनायक घनबहादूर, डॉ.रोहिणी साळवे, ज्योत्स्नाताई कांबळे, प्राचार्य हसण इनामदार आदी २६ जणांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक साळवे, राहुल गवळी, संकेत साळवे, प्रवीण बनकर, अमोल खरात, राजेंद्र हिवरे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आभार राहुल साळवे यांनी मानले.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या