Advertisement

Responsive Advertisement

नवीन आष्टी - अहमदनगर रेल्वे मार्गदोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास



            बीडदि. 23 : नवीन आष्टी - अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर शासन भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

            अहमदनगर – बीड - परळी वैजनाथ या २६१ कि.मी. रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या  नवीन आष्टी - अहमदनगर ६६ कि.मी. मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलत होते.

            प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहसूलपशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलकेंद्रीय रेल्वेकोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होते. माजी मंत्री पंकजा मुंडेखासदार डॉ. प्रीतम मुंडेखासदार डॉ. सुजय विखे पाटीलआमदार सर्वश्री बाळासाहेब आजबेलक्ष्मण पवारसुरेश धसआष्टीच्या नगराध्यक्षा श्रीमती पल्लवी धोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

            दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न आज सत्यात आले आहेयाचे आपणास विशेष समाधान असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेआज गोपीनाथराव हयात असते तर त्यांनी हा मार्ग बीड- नगरवासियांना अर्पण केला असता. राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांबाबत त्यांनी दूरदृष्टी दाखवली होती. त्यात या  रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहेअसे त्यांनी सांगितले.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रगती योजनेत अहमदनगर - बीड - परळी या २६१ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. त्यासाठीच्या ५० टक्के खर्चाच्या तरतुदीची जबाबदारी शासनाने उचलली आहेअसे स्पष्ट करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेहा रेल्वे प्रकल्प केवळ दोन भूभाग आणि स्थानकांना जोडणारा नाहीतर माणसेनातीगोती आणि हृदयांना जोडणारा आहे. या रेल्वेमुळे आता अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांना रोजच विकासाची धडधड जाणवणार आहे. विद्यमान शासनाच्या विकासाचा मार्ग वेगाचा राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

            राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मराठवाड्यातील हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकल्याबद्दल मध्य रेल्वेच्या  कर्मचारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

            दीर्घ संघर्षानंतर अहमदनगर-आष्टी रेल्वे धावत असल्याचा आपणास आनंद असल्याचे  सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेदिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बीड येथे रेल्वेसेवा सुरू व्हावीयासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. आज पहिल्या टप्प्यात न्यू आष्टी - अहमदनगर डेमू आणि रेल्वे मार्गाचे उदघाटन झाले. हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेलअसे ते म्हणाले.

            आपण मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचा दर तीन महिन्याला आढावा घेत होतो. यासाठी आवश्यक तो भरीव निधी केंद्र व राज्य शासनाने दिला. राज्याचा भागीदारी हिस्सा सुरू करण्याचा निर्णयही या शासनाने घेतलाअसे स्पष्ट करुन श्री. फडणवीस म्हणालेयेथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कृष्णा - मराठवाडा प्रकल्पास सुधारित मान्यता देऊन भरीव निधी दिला जाईल. शिवाय मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी समुद्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा शासनाचा निर्धार आहेअसे सांगतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीचे लवकरच लोकार्पण करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

            अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती सर्वांच्या साक्षीने आज होत असल्याचे सांगून रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे म्हणालेमराठवाड्यातील बीडव्यतिरिक्त अन्य जिल्हे रेल्वेने जोडले गेले होते. पहिल्या टप्प्यातील रेल्वेने आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासह सर्वांच्या मनातील स्वप्नपूर्तीची सुरुवात होत आहे. या मुख्य प्रकल्पासाठी 96 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. बीडपर्यंतचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            अहमदनगर - परळी रेल्वेच्या विद्युतीकरणास मंजुरी देण्यात आली असून2014 पासून रेल्वे कामांना गती मिळाली आहे. 400 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत असून त्यापैकी 120 गाड्या  लातूरच्या कारखान्यात तयार करण्यात येणार असल्याचे श्री. दानवे यांनी  यावेळी सांगितले.

            बीड आणि अहमदनगर जिल्हा रेल्वेने जोडले जात असल्याचा आनंद व्यक्त करून मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेसहकारी कारखानदारी सुरू ठेवण्यात बीड जिल्ह्याचे योगदान आहे. या रेल्वेमुळे बीड हा राज्यातील एक अग्रगण्य जिल्हा होईल. या रेल्वेला परळीपर्यंत नेण्याची जबाबदारी रेल्वे राज्यमंत्री श्री.दानवे यांची असल्याची अपेक्षा आहे. रेल्वेसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल तसेच पुरेसा निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्रीमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्रीरेल्वे राज्यमंत्री यांचे आभार मानले.

            खा. प्रीतम मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोगतात बीडवासियांची स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद व्यक्त करून केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या