Advertisement

Responsive Advertisement

शासकीय निवासी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकव शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांच्या सन्मान


औरंगाबाद, दि.21, -   समाज कल्याण विभागाचे आयुक्त, डॉ.प्रशांत नारनवरे  यांच्या संकल्पनेतुन शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या अनुसुचित जाती व नव बौध्द मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांच्या सन्मान नुकताच करण्यात आला.

औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, जलील शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे होते तर प्रमुख पाहुणे सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा, औरंगाबाद किरणकुमार धोत्रे, सहाय्य्क संचालक, औरंगाबाद प्र.शि.निंबाळकर, सहाय्यक आयुक्त्, सर्वश्री. पी.बी .वाबळे, आर एम शिंदे, अमित घवले, लक्ष्मी गायके, अदिनाथ खेडकर, वासनिक आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औरंगाबाद विभागातून तीन मुख्याध्यापक, तीन शिक्षक व तीन गृहपालांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये मुख्याध्यापक निलेश भामरे, मुख्याध्यापिका आस्मिता जावळे, प्रभारी मुख्याध्यापक आर एस जोशी यांना पुरस्कृत करण्यात आले. अजित आर भागवत, श्री. कृष्णा हराळ, श्री. बी जे खोडके, या सहशिक्षकांना व   गोरक्ष खेडकर , एम.एन गोणारकर, आर.एस.भराडे, या गृहपालांना गौरविण्यात आले. 

कार्यक्रमांचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी संजय देवकते तर सहाय्यक संचालक, वित्त व लेखा, औरंगाबाद प्र.शि.निंबाळकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या