Advertisement

Responsive Advertisement

संघटित गुन्हेगारी करणा-या विरुध्द पोलीस अधीक्षकांची सक्त कारवाई … एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द.. एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात रवानगी होणारा सलग चौथा आरोपी…

औरंगाबाद -
 

  मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांनी जिल्हयातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगारांन विरूध्द कठोर भुमिका घेत त्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. जिल्हयातील गुन्हेगारी कारवाई करणारा चौथा आरोपी हा एम.पी.डी.ए. ऍ़क्ट खाली हर्सुल कारागृहत स्थानबध्द करण्यात आला आहे.

 पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्यीतील ईसम नामे सरफराज सलीम शहा वय 27 वर्षे रा. सांवगी लासुर स्टेशन ता. गंगापुर जि.औरंगाबाद यांचे विरूध्द पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे खालील भादंवी कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
1) भादंवी कलम 379, 380 अन्वये (02 ) गुन्हे,  2) भादंवी कलम 457, 380 अन्वये ( 02 ) गुन्हे 
3) भादंवी कलम 324,143,147,148,149, 504,506 अन्वये (01) 4) भादंवी कलम 457, 392 अन्वये ( 01) गुन्हा 5) भादंवी कलम 354, 452,380 अन्वये (01) गुन्हा. 
अशा प्रकारे घरफोडी, जबरी चोरी, विनयभंग, दुखापत, दंगा, व चोरी असे शरिराविरूध्द व मालाविरूध्दचे एकुण 08 गुन्हे करित असतांना बेकायदेशिर कृत्ये करून धाकदपटशा करण्याचा सवईचा असुन दारू पिण्यासाठी लोकांना धमकावुन पैसे मागतो नाही दिले तर मारहाण करतो त्याच्या अशा कृत्यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातारण निर्माण झाले आहे.
  त्याचे गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याचेविरूध्द वेळोवेळी प्रतिबंध कारवाई सुध्दा करण्यात आली होती. परंतु याबाबीचा त्याच्येवर काहि एक परिणाम न होता त्याने त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चढत्या क्रमाने चालुच ठेवलेल्या होत्या. 
त्याअनुषंगाने एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍ़क्टिविटी) कायद्यानुसार म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, धोाकदायक व्यक्ती, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, वाळु तस्कर, व अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे, दृक श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडीओ पायरेसी) असे विद्यातक कृत्य करणा-या व्यक्तींना आळा घालण्याबाबत एम.पी.डी.ए. कायद्यान्वये त्याचे गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते. 
 त्यामुळे  मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व शिल्लेगाव पोलीसांनी त्याचे विरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांचे कडे सादर करण्यात आला होता.

यावरून  सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,औरंगाबाद यांनी दिनांक 19/9/2022 रोजी सरफराज सलीम शहा वय 27 वर्षे रा.सांवगी लासुर स्टेशन ता. गंगापुर जि. औरंगाबाद याचे विरूध्द ए *म.पी.डी.ए अधिनियम 1981 सुधारित 2015 चे कलम 3 (1) अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित केला.

 त्यावरुन त्यास काल दिनांक 19/09/2022 रोजी स्थानबध्दतेचे आदेश तामिल करून मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. 
यापुर्वी पोलीस ठाणे पाचोड हद्यीतील सराईत गुन्हेगार अमोल जगन्नाथ चिडे वय 27 वर्षे रा. मुरमा ता. पैठण जि. औरंगाबाद आणि पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्यीतील सनव येथील कुख्यात वाळु माफिया मुजीब अब्दुल शेख ÷ वय 34 वर्षे रा. सनव ता. गंगापुर जि. औरंगाबाद, सिल्लोड ग्रामीण हद्यीतील ईसम नामे रामदास विठ्ठल वाघ वय 33 वर्षे रा. केळगाव ता. सिल्लोड जि. औरंगाबाद यांना एक वर्षेसाठी स्थानबध्द करण्याची कारवाई करण्यात आली होती.

सदरची कारवाई  मनीष कलवानीया, पोलीस अधीक्षक, .डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश बेले, उपविभागीय पोलीस अधिकारी,गंगापुर, स्था.गु.शा. चे रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक, मच्छिद्र सुरवसे, पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार विठ्ठल राख, शगुन थोरे, तात्यासाहेब बेंद्रे, सातपुते, गुडे, भिसेे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या