Advertisement

Responsive Advertisement

त्यागमूर्ती महर्षि दाधीच ब्राम्हण समाजातर्फे भजन संध्या व जागरण उत्साहात


औरंगाबाद : समस्थ दाधीच ब्राम्हण समाज संभाजीनगर यांच्यातर्फे दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन अग्रसेन भवन, पानदरीबा येथे आयोजन केले होते.. शनिवार, ३ व रविवार ४ सप्टेंबर दरम्यान हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
 यावेळी जागरण व भजन संध्येला आकृती मिश्रा भिलवाडा, चेतन प्रजापती जोधपूर यांची  विशेष मैफिल रंगली होती. त्यागमूर्ती महर्षि  दधिचजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या व दधीमती मातेला अभिषेक, कन्यापूजन, यज्ञ, महाआरती,महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवर व भाविकांचे समस्थ दाधीच ब्राम्हण समाज संभाजीनगरतर्फे स्वागत करण्यात आले.
रमेश दायमा, रामेश्वर दायमा, सुनील दायमा आदींनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,  संजय मंत्री, आर. बी. शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या