Advertisement

Responsive Advertisement

पायात बुट घालून रथ ओढणाऱ्या नेत्यांनी गणेश भक्तांची जाहीर माफी मागावी - विकास पाटील गायकवाड

औरंगाबाद -
राज्यात नव्याने आलेलं शिंदे-भाजप सरकार आणि शिवसेनेतील वाद काही थांबता थांबत नाहीये. त्यातच हाच वाद आता गणेशोत्सवात सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबादमध्ये सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असं मानापमान नाट्य पाहायला मिळालं. मागील 28 वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या अनुपस्थित संस्थांन गणपतीची सार्वजनिक आरती करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना राग अनावर झाला. 

दरवर्षी सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आरती करतात. त्यानंतर हे सर्व नेते एकत्र येऊन संस्थान गणपतीचा रथ ओढतात आणि सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होती. मात्र यावेळी आरतीला भाजपाचे नेते तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे आणि इतर भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते. काही वेळानंतर अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे आले आणि मग मानापमान नाट्याला सुरुवात झाली. 

आरतीच्यावेळी भाजप नेत्यांनी खैरे यांची वाट न पाहता आरती केल्याने शिवसेनेच्या नेत्यांचा पारा चढला. त्यातच स्टेजवर सुद्धा सर्वच भाजप नेते असल्याने दानवे आणि खैरे यांनी तेथून काढता पाय घेतला. तसेच त्यांनी सुद्धा भाजपाच्या नेत्याची वाट न पाहता संस्थान गणपतीचा रथ बूट पायात घालून बुटसह  ओढायला सुरुवात केली.त्यांच्या बरोबर सर्वच नेत्यांनी  त्यामुळे संस्थान गणपतीचा रथ ओढताना सर्वच नेत्यांनी पायातील बुटासह रथ ओढताना दिसून आले.

सर्वच पक्षांचे नेते उपस्थित असतांना आरती करण्याची प्रत्येक वर्षांची परंपरा आहे. मात्र भाजप नेत्यांनी खैरे आणि दानवे यांच्या अनुपस्थितचा आरती सुरु केल्याने अंबादास दानवे चांगलेच संतापले. दानवे एवढे संतापले होते की, त्यांनी आयोजकांना शिवीगाळ केली असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे औरंगाबादच्या गणपती विसर्जनाची सुरवात राजकीय मानापमान नाट्याने व संस्थान गणपतीचा रथ पादत्राणे पायात घालून ओढताना सुरुवात झाल्याची पाहायला मिळाले. या मुळे सर्व गणेश भक्तांना या नेत्यांविषयी प्रचंड चीड निर्माण झाली असून या सर्वांनी गणेश भक्तांची जाहीर माफी मागावी अशी मागणी विकास पाटील गायकवाड यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या