Advertisement

Responsive Advertisement

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन

औरंगाबाद दि. १६ - निझामाच्या तावडीतून मराठी माणसाच्या हितासाठी अनेकांनी सर्वस्व अर्पण केले.
यामुळे आताच्या सरकारने ध्वजरोहणची परंपरामोडून वेळेचा बदल केला. त्यामुळे जुनी ९ वाजेची परंपरा कायम ठेवण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. शनिवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक येथे स्वातंत्रलढ्यातील सैनिकांना शिवसेनेच्यावतीने अभिवादन करण्यात येणार आहे.
हैदराबाद मुक्तीसंग्राम
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून, यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी शिवसेना मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, सहसंपर्कप्रमुख त्रंबक तुपे, महानगरप्रमुख माजी आमदार किशनचंद तनवाणी, आमदार उदयसिंग राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, पश्चिम तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, महिला संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा समनव्यक माजी महापौर कला ओझा, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, राखी परदेशी यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, राजू राठोड, बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, बाप्पा दळवी, विधानसभा संघटक राजू वैद्य, सुशील खेडकर, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे यांच्यासह तमाम शिवसैनिक व युवासैनिक आणि महिला आघाडी पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या