Advertisement

Responsive Advertisement

गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जनता मतदानाची वाट पाहत आहे - युवासेना सचिव वरुण सरदेसाई
औरंगाबाद, दि. १९ (प्रतिनिधी) - औरंगाबाद जिल्हा हा मुंबई ठाण्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता बालेकिल्ला होता. याच बालेकिल्ल्याने सहा शिलेदार विधानभवनात पाठवले, मात्र चार ते पाच वेळा शिवसेनेने संधी देऊनही काही लोकांनी गद्दारी केली, हे लोकांना अजिबात आवडले नाही. त्यामुळे गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जनता मतदानाची वाट पाहत असल्याचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. संभाजीनगर मध्य मतदारसंघात युवासेना शाखेचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटना मजबूत असल्याने गद्दार लोकांना सळो की पळो करून सोडवण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.    संभाजीनगर मध्य विधानसभा अंतर्गत श्रीकृष्णनगर, टिव्ही सेंटर, हडको,  टीव्ही सेंटर चौक येथे संपन्न झाले या प्रसंगी युवक प्रचंड संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात युवासेना संभाजीनगर मध्य च्या वतीने शहर प्रमुख सागर खरगे यांनी केले. याप्रसंगी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, माजी नगरसेवक मोहन मेघावाले, महिला आघाडी जिल्हासंघटक प्रतिभा जगताप, युवासेना जिल्हा समन्वयक संदीप लिंगायत, उपजिल्हा अधिकारी नारायण सुरे, युवती सेना जिल्हा युवती अधिकारी पूजा घुगे, सानिका देवराज, श्वेता टोंपे, धर्मराज दानवे, स्वप्निल डिडोरे, सागर वाघचौरे, प्रसाद पानपट, अभिजित थोरात, मधुर चव्हाण, आकाश जैन, नागेश थोरात, खुशाल हरणे, राहुल पेरे, कृष्णा मोटे, सागर भारस्कर, नितु मानकापे, अजय रेड्डी, शुभम त्रिभुवन, किरण सुरे, राजतिलक मेघावाले, महिला आघाडीच्या संगीता बोरसे, रंजना कोलते, पुष्पा सालपे आदी शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी विभाग युवाअधिकारी केदार पोतदार, उपविभाग युवाअधिकारी आश्लेष कुमावत, शाखा युवाअधिकारी अनिकेत साळवे यांची नियुक्ती करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या