Advertisement

Responsive Advertisement

शिवसेना तर्फे गणेश मंडळाचे स्वागत


औरंगाबाद, दि. १० (प्रतिनिधी) - दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. मात्र यावर्षी भाविकांच्या आनंदाला उधाण आले होते. अगदी पहिल्या दिवसापासून ते गणेश विसर्जन शांतपणे पार पडला. तर गुलमंडी, संभाजीपेठ आदी ठिकाणी शिवसेनेच्या वतीने गणेश मंडळ, गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी महानगरप्रमुख माजी आमदार किशनचंद तनवाणी,  माजी महापौर नंदकुमार घोडेले, ऍड. आशुतोष डंख, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, सुनीता देव, कला ओझा, प्रतिभा जगताप, अंजली मांडवकर,  नलिनी बाहेती, नलिनी महाजन, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, माजी नगरसेवक सचिन खैरे,
विजय सूर्यवंशी झ प्रशांत मस्के आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या