Advertisement

Responsive Advertisement

टेंडरसाठी बनावट कागदपञे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ज्ञानेश्वर रोकडे/ जिंतूर

                    जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा-डोनवडा संयुक्त ग्रामपंचायत करिता राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे 44,44,499 लक्ष रुपयांचे कंत्राट मिळविण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बनावट स्वाक्षरी ठराव सादर करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तालुक्यातील मौ.बलसा येथील खाजगी गुत्तेदार लक्ष्मण पिराजी ईलग व परतूर येथील शासकीय गुत्तेदार किशोर कद्रे यांच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात आजरोजी सरपंच यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी कि, ग्राम पंचायत कार्यालय पिंप्राळा-डोनवाडा येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे ४४,४४,४९९लक्ष रुपयांच्या निविदेला  मंजुरी मिळाली होती सदर कामाची रितसर निविदा जिल्हा परिषद परभणी यांच्या मार्फत निघाली होती. त्यामध्ये किशोर विजयकुमार कद्रे पद्मनाभस डेव्हलपर्स परतूर यांना सदर काम देण्यात आले होते. परंतु १०% लोकवर्गणी सहभाग असल्याचा ग्रामपंचायतचा ठराव घेऊन जलजिवन मिशन बँकेच्या खात्यात जमा करणे आवश्यक असते त्यासाठी आरोपी लक्ष्मण पिराजी ईलग व किशोर विजयकुमार कद्रे पद्मनाभस डेव्हलपर्स परतूर यांनी ग्राम पंचायत पिंप्राळा-डोनवाडाच्या सरपंच सौ.जयश्री शिवाजी चाफे व ग्रामसेवक एस.डी.इंगळे यांना विचारात नं घेता बनावट स्वाक्षरी व शिक्का वापरुन बनावट कागदपत्राच्या आधारे कार्यारंभ आदेश करून घेतल्याचा आरोप आहे. 
त्या अनुषंगाने सरपंच जयश्री चाफे यांनी सदर बोगस कागदपत्रावर आक्षेप घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यांनतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रीतसर सखोल चौकशी केली असता सदर कंत्राटदार दोषी आढळून आले होते. त्यानंतर सरपंच जयश्री चाफे यांनी जिंतूर पोलीस स्टेशन येथे समक्ष उपस्थित राहून फिर्याद दिली असता नमूद दोन्ही आरोपी विरुध्द भा.द.वी. कलम 420, 467, 468, 471 व 34 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी लक्ष्मण इलग हे जिंतूर भाजपाचे तालुका सरचिटणीस असल्याने या प्रकरणाची तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या