Advertisement

Responsive Advertisement

रत्नाळी येथील सात दिवशीय गणेश मंडळांचे शांततेत विसर्जन...


धर्माबाद- येथील नगरपालिका कार्यकक्षेत असलेल्या मौजे रत्नाळी येथील सात दिवशीय श्री चे काल जोरदार पर्जन्य वस्तीमध्ये व शांततेत विसर्जन झाले.
रत्नाळी येथे 14 गणेश मंडळांनी श्री ची स्थापना केली होती. यामध्ये 1981 पासूनची परंपरा असलेल्या संगम गणेश मंडळांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा रत्नाळी येथील भूमिपुत्र डॉक्टर नागेश लखमावाड यांचा काल विसर्जन मिरवणुकीत हिरीरीने सहभाग होता. त्यांच्यामार्फत  एकच रंग असलेले स्त्रिया व पुरुषांना ड्रेसेस व फेटे वाटप करण्यात आले. त्यांच्या सहवासात स्त्रियांनीही मोठा सहभाग मिरवणुकीमध्ये नोंदवला होता. अगदी लहान मुलींपासून ते वयोवृत्त स्त्रिया पर्यंत सर्वच जण बाप्पांना निरोप देण्यासाठी भर पावसात नाचत होते. संगम गणेश मंडळाची शिस्त व वेशभूषा पाहून धर्माबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांनी आपल्या स्वयंनिधीतून अकराशे रुपये भेट दिली. लगेच संगम गणेश मंडळांनी विचार विनिमय करून ती भेट बँड पथकाला बक्षीस म्हणून देऊन टाकली.
सदरील श्रीची मिरवणूक शांततेत संपन्न व्हावी म्हणून डॉक्टर संजीव लोलापोड यांचा सहभाग होता. श्री संगम गणेश मंडळाचेही सर्वच कौटुंबिक सदस्यांनीही यासाठी अथक परिश्रम घेतले.
श्री ची मिरवणूक शांततेत संपूर्ण व्हावी यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या आदेशाने व धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हिब्बारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलीस उपनिरीक्षक वाडेकर, विजय पंतोजी, बीट जमादार सय्यद अबेद, कारामुंगे, सुपारे, शिरीष मांजरमकर, यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त होता‌. त्यामुळे रात्री उशिरा श्री मिरवणूक अतिशय शांततेत संपन्न झाली असून उद्या नऊ दिवसीय नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाळापूर येथील श्री चे तर धर्माबादचे विसर्जन शुक्रवारी  होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या