Advertisement

Responsive Advertisement

शेतातील रस्त्याचा नियमबाह्य निकाल ऐकून महिलेला तहसिल कार्यालयातच हृदय विकाराचा झटका, सोयगाव तहसिल कार्यालयात तणाव....

सोयगाव/विजय पगारे
--------------------------
महसूल विभागाची कोणतीही पूर्वकल्पना नसून,महसुली सुनावणीची नोटीस प्राप्त नसतांनाही शेतातून नियमबाह्य  रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय तरुणीला नायब तहसीलदारांच्या दालनातच सौम्य हृदयविकाराचा झटका ठेवून महिला अत्यवस्थ झाल्याची घटना सोमवारी दि.०५ सोयगाव तहसिल कार्यालयात तीन वाजेच्या सुमारास घडली याप्रकारामुळे सोयगाव तहसिल कार्यालयात तणाव पसरला होता. तातडीने घटनास्थळी सोयगाव पोलिसांनी पाचारण करण्यात आले, त्यामुळे तणाव निवळला..गंभीर अवस्थेत महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले...
   चांद्रकालाबाई पांडुरंग शिंदे(वय ४५) रा.पळाशी ता.सोयगाव असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध झालेल्या महिलेचे नाव आहे.पळाशी शिवारात या महिलेचे गट क्र-२९७ एक हेक्टर शेती आहे,याच शिवारातून गट क्र-२९५ आणि २९६ कडे जाण्यासाठी व येण्यासाठी गैर अर्जदार आणि प्रतिवादी इतर दोन विरुद्ध चार अशा सहा शेतकऱ्यांना याप्रकरणी नोटिसा प्राप्त होत्या, या प्रकरणी चंद्रकलाबाई शिंदे या महिलेला रस्त्याच्या सुनावणी साठी कोणतीही नोटीस अथवा पूर्वकल्पना प्राप्त नव्हती परंतु तरीही आपल्याच शेतातून गट क्र-२९७ मधून रस्ता दिल्याची कुणकुण या महिलेला लागली त्यामुळे या महिलेने पळाशी वरून थेट सोयगाव तहसिल गाठून हातात चक्क विषारी कीटकनाशका ची बाटली घेऊन नायब तहसीलदार महसूल-१ गोरखनाथ सुरे यांचे दालन गाठले व माझ्या शेतातून नियमबाह्य रस्ता कोणत्या आधारावर दिला याचा जाब विचारून तुमच्या शेतातून जुना वापरता व बंद केलेला रास्ता दिल्याचे ऐकून या महिलेने हातातील कीटकनाशका चे सेवन करण्याचा प्रयत्न केला परंतु काही नागरिक व नायब तहसीलदार यांनी त्या महिलेच्या हातातील कीटकनाशका ची बाटली हिसकावून घेतली असता,या महिलेला धास्तीपोटी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याने चंद्रकलाबाई शिंदे या बेशुद्ध झाल्यामुळे थेट दालनात पडल्याने तहसिल कार्यालयात गोंधळ उडाला होता...घटनास्थळी तातडीने ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाला पाचारण करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉ., किरण पवार यांनी महिलेला दालनात तपासणी केल्यावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या