Advertisement

Responsive Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दीजमविण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव ,बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांने काढला फतवा गटविकास अधिकाऱ्यांने सूचना दिल्याचा उल्लेख


औरंगाबाद(प्रतिनिधी) - शिवसेनेशी गद्दारी केलेल्या संदिपान भुमरे यांचा चेहराही पैठणकरांनी बघितला नाही. मोठा गाजावाजा करून भुमरे यांनी घेतलेल्या सभेला चार जणही आले नाहीत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १२ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या सभेचे हसे होऊ नये म्हणून चक्क सरकारी अधिकारयांनीच धावाधाव सुरू केली आहे. बालविकास प्रकल्प अधिकारयाने गटविकास अधिकारयाच्या सूचनेवरून फतवा काढला असून, जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांना सभेला हजर  राहण्याचे फर्मान सोडले आहे.
केवळ सत्तेसाठी इमान बदलणाऱ्या संदिपान भुमरे यांनी गद्दारी केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी २७ ऑगस्ट रोजी मतदारसंघात पाय ठेवला. पण स्वाभिमानी पैठणकरांनी गद्दाराचा चेहराही पाहिला नाही. संदिपान भुमरे यांच्या कार्यक्रमाकडे पैठणकर फिरकलेही नाहीत. रिकाम्या खुच्र्या पाहून आग आग झालेल्या भुमरेंची गाडी वारकरयांवर घसरली.   ‘नाथमंदिरात वारकऱ्यांना मी पुâकट जेवण देतो, तरीही मला गद्दार म्हणता’, असे म्हणत भुमरेंनी वड्याचे तेल वांग्यावर काढले. भुमरेंनी पत्रकारांच्या नावानेही ठणाणा केला होता. एवढेच नाहीतर कार्यक्रमानंतर काही पत्रकारांना भुमरेंच्या बगलबच्च्यांनी दरडावणीची भाषाही वापरली होती.
२७ ऑगस्ट रोजी पैठणकरांनी दाखविलेल्या हिसक्याची संदिपान भुमरे यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचाही ‘गटाणा’ होऊ नये म्हणून भुमरेंनी गावागावांची पायधूळ झाडली. पण त्यांच्या गद्दारीला कुठेही थारा मिळाला नाही. पैठणकरांचा असहकार पाहून भुमरेंनी जिल्ह्यातील इतर गद्दारांनाही हाताशी धरले.  लाथाबुक्क्याफेम कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्रिपद न मिळाल्याने लालेलाल झालेले संजय शिरसाट, प्रा. रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल यांना सभेला गर्दी जमविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, अतुल सावे यांनीही आपली उरलीसुरली शक्ती पणाला लावली आहे. परंतु, गर्दी जमण्याची खात्री पटत नसल्याने जिल्हा परिषदेला वेठीला धरण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पैठण येथे १२ सप्टेंबर रोजी होणाNया सभेला हजर रहावे, असे फर्मान बालविकास प्रकल्प अधिकाNयांनी सोडले आहे. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांने ८ सप्टेंबर रोजी हे पत्र काढले आहे.
राजकीय सभेसाठी प्रथमच...
एखाद्या राजकीय सभेसाठी प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे फर्मान काढण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. अशा प्रकारचे पत्र कधीही जिल्हा परिषदेकडून काढण्यात आलेले नाही. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांने बोलण्यास नकार दिला. कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चेवरून हे पत्र काढण्यात आले, असे एका अधिकाऱ्यांने सांगितले. 

अमक्याचे लग्न, तमकेच वNहाडी
पैठणकरांनी झिडकारल्याने गेल्यावेळी संदिपान भुमरे यांच्यावर रिकाम्या खुच्र्यांना मार्गदर्शन करण्याची वेळ आली होती. आता तसे हसे होऊ नये म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून गर्दी वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांना सभेला बोलावण्यापेक्षा त्यांचे मानधन वेळेत मिळेल, याकडे लक्ष दिले तर बरे होईल. 
अंबादास दानवे, विरोधी पक्षेनेते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या