Advertisement

Responsive Advertisement

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी येवती शाळेची निवड...


धर्माबाद:- तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन विस्डम इंग्रजी शाळेत भरण्यात आले होते. उच्च प्राथमिक शाळा विभागातून 23 शाळांनी 67 प्रयोगासह सहभाग नोंदविला होता.

 यात " हवेच्या दाबाचा वापर करून स्वयंचलित वाहतूक नियंत्रित करणे " या नावीन्यपूर्ण प्रयोगास प्रथम क्रमांक देऊन दि.6 व 7 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ग्रामीण तंत्रनिकेतन विद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे पाठविण्यास निवड करण्यात आली. हा प्रयोग कु.रोशनी बोईनवाड, कु.शितल पांचाळ,कु. धनश्री भोसले या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषय शिक्षक श्री सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला. त्यासाठी शाळेतील सेवाजेष्ठ शिक्षक श्री व्यंकटेश बत्तुलवार यांनी परिश्रम घेतले. शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षण विस्तार अधिकारी करखेली श्री शिवकुमार पाटील यांनी हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी मदत केली. 
या निवडीचे गटशिक्षणाधिकारी श्री रविशंकर मरर्कंटे साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालाजी भोसले, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जीपी मिसाळेसर, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे, संपादक मनोज बुंदेले, शिवराज पाटील गाडीवान व गावातील पालकांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या