Advertisement

Responsive Advertisement

अनियमित वेतना अभावी शिक्षकांची कस्तुरबा गांधी विद्यालयास सोडचिट्टी,नववी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तासिकांवर होतोय परिणाम


धर्माबाद- शहरातील जन्मभूमी ते कर्मभूमी या महामार्गास लागून असलेल्या रामेश्वर जवळील कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षकां अभावी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरील संस्थेत नववी व दहावी या दोन वर्गांसाठी शासकीय नियमानुसार असलेल्या पदमान्यते नुसार एकूण चार शिक्षकांपैकी दोन पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. याचा परिणाम या दोन्ही वर्गातील विद्यार्थिनीच्या अभ्यासक्रमावर होत आहे. त्यामुळे शैक्षणिक कालखंडातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या विद्यार्थीनिंचे होणार नुकसान टाळण्यासाठी पदमान्यतेनुसार शिक्षकांची भरती करण्यात यावी अशा प्रतिक्रिया पालकांतून येत आहेत. 
        याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्य शासन व केंद्र शासन यांच्या समन्वयातून चालवले जाणारे कस्तुरबा गांधी विद्यालय श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमार्फत शहरामध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. सदरील विद्यालयात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सहावी ते आठवी व मानव विकास अंतर्गत नववी ते दहावी या इयत्ता आहेत.  त्यानुसार नववी व दहावीसाठी मानव विकास अंतर्गत चार शिक्षकांची नेमणूक करण्याचा शासन निर्णय आहे, मात्र त्यापैकी दोनच शिक्षक येथे उपलब्ध असून यास जबाबदार शासनाकडून सदरील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनातील अनियमितता कारणीभूत असल्याचेही निदर्शनास येत आहे.  इतर शिक्षकांच्या तुलनेत पाहता या विद्यालयातील शिक्षकांचे मानधन अत्यल्प असून तेही वेळेवर मिळत नाही वर्षातून तीन ते चार वेळा शिक्षकांचा पगार होतो. तर सलग तीन तीन महिने पगार होत नसल्याने घर कसे चालवायचे हा प्रश्न शिक्षकांना पडतो आहे. त्यामुळे येथे जास्त काळ शिक्षक राहत नाहीत असं येथील शिक्षकांचं म्हणणं आहे. यामध्ये शिक्षकांच्या कमतरते अभावी तासिकांचा अतिरिक्त बोजा कार्यरत असणाऱ्या शिक्षकांवर पडतो आहे. आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणे ही स्वभाविक आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थिनी येथे शिक्षण घेत आहेत त्यामुळे खाजगी शिकवण्या या बाबी त्यांच्यापासून दूरच आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मंजूर असलेली पूर्ण पदे भरणे गरजेचे आहे.
सध्या नववी व दहावीसाठी चार पैकी दोनच शिक्षक उपलब्ध असून रिक्त पदांसाठी नवीन शिक्षक उपलब्ध करून घेण्यासाठी आमचे कसोशीचे प्रयत्न चालू आहेत. आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांकडून इतर विषयांच सुद्धा अध्यापन केल्या जात आहे. 
                            सौ.संगीता चुडावकर.
                                मुख्याध्यापिका, 
                     कस्तुरबा गांधी विद्यालय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या