Advertisement

Responsive Advertisement

निलंबित पोलिस निरिक्षक बकाले यांना तात्काळ अटक करणेसाठी व महाजन यांचे निलंबन मागे घेण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना मराठा समाजातर्फे निवेदनाद्वारे मागणी

         
       जळगाव -  जातीयवादी पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह  वक्तव्य केल्यामुळे समाजाच्या भावना खूपच दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे किरण कुमार बकाले यांना निलंबित करण्यात आलेले आहे. या प्रकरणात त्यांना संपूर्ण दोषी ठरवून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मराठा समाजातील विविध संघटनांनी आज पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे  केली आहे.
      तथापि या ठिकाणी सहायक फौजदार श्री अशोक ओंकार महाजन यांना निलंबित करण्यात आलेले आहे सदर प्रकरणाची त्यांचा काही एक संबंध नसताना त्यांना निलंबित करण्यात आले हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. त्यामुळे श्री महाजन यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पूर्ववत शासन सेवेत सामावून घेण्यात यावे अशी विनंती मराठा समाजाच्या वतीने मराठा सेवा संघ ,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड,अ.भा. छावा संघटना, बुलंद छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा ,सकल मराठा समाज या सर्व संघटनांकडून करण्यात आली आहे.यावेळी अधिक्षक डाॕ.प्रविण मुंढे यांनी आश्वासन दिले कि- जातियवाद अधिकारी बकाले यांचेवर कठोर कार्यवाही जरुर केली जाईल.व अशोक  महाजन यांचेवर अन्याय होऊ देणार नाही. यावेळी प्रा.डी डी बछाव,राम पवार, हिरामण चव्हाण, मधुकर पाटील, गिरीश पवार, चंद्रकांत देसले, दिनेश कदम, सुरेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे संतोष पाटील, नंदू भाऊ सोनवणे, विनोद देशमुख, विजय देसाई, सुचिता पाटील, मनीषा पाटील, लीना पवार, गीतांजली देसाई, पूनम पाटील, मीनल देवरे, भारती पवार, कांचन पाटील, माधवी ठाकरे, शिवराम पाटील, संदीप पवार, संजय पाटील, रामचंद्र पाटील, अनिल पाटील, उमेश देवरे संतोष पाटील, भीमराव मराठे, मनोज मोहिते, संजय पाटील, उमेश बाविस्कर, भगवान शिंदे,हर्षल पाटील, सुनील गवळी,रविंद्र पाटील,ज्ञानेश्वर सांळूखे,दिनकर मराठे,देविदास चौधरी, शिवाजी पाटील, देविदास सपकाळे, सतीश पाटील, विशाल पाटील, राजाराम भोसले, सुरेश पवार, उल्हास पाटील बाळू पाटील, सचिन पाटील, सचिन पवार, केतन पाटील आदी समाजबांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या